विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी महाज्योती संस्था नागपूर मार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये महाज्योती संस्था OBC, VJ, NT आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना घेऊन आली आहे. ही योजना म्हणजे मोफत टॅबलेट वाटप योजना. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्याधुनिक Android Tablet मोफत दिला जातो. ही योजना खास ११वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे याच योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत तर दिलेली माहिती शेवट पर्यंत वाचावी.
👨💻 महाज्योती टॅबलेट योजना म्हणजे काय?
Free Tablet-विद्यार्थी मित्रानो दरवर्षी महाराष्ट्र शासना मार्फत CET,JEE,NEET या अभ्यास क्रमारीता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते. विद्यार्थ्यां डिजिटल शिक्षणात मागे पडू नये, म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोफत टॅबलेट वाटप केले जाते ही योजना पूर्णपणे “फ्री टॅबलेट वितरण” योजना आहे, ज्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना एक मोफत टॅबलेट दिला जातो, ज्यामध्ये स्पर्धा परीक्षासाठी सर्व आवश्यक असे ई-स्टडी मटेरियल,व्हिडीयो लेक्चर्स आणि टेस्ट सिरीज पूर्ण आधीच लोडेड करून दिलेल्या असतात. यामध्ये तुम्हाला आपल्या एरियामध्ये चांगले नेटवर्क असलेले एक सीम कार्ड निवडायचे असते ज्यामध्ये तुम्हाला शासनातर्फे दररोजच्या अभ्यासक्रमाकरिता दोन वर्षा पर्यंत ६ GB इंटरनेट अगदी मोफत दिल्या जाते.
📌 योजनेचा उद्देश काय आहे ?
- शासनातर्फे मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्याकरीता दरवर्षी हि योजना राबवली जाते.
- स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी हा यामागचा हेतू आहे.
- विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाशी जोडणे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या करीता ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणे.
🎓 पात्रता (Eligibility)
१. विद्यार्थी हा OBC, VJ, NT, किंवा SBC प्रवर्गातील असावा.
२. विद्यार्थी/विद्यार्थीने इ. १० वी उत्तीर्ण करून चालू शैक्षणिक वर्षामध्ये ११ वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
3. विद्यार्थी/विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
४. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ६०% तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना ७०% गुण असणे आवश्यक.
५. विद्यार्थी २०२५ मध्ये इयता १० वी उतीर्ण असावा.
६. लाभार्थी निवड हि दहावी च्या प्राप्त टक्केवारी नुसार आणि समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
📑 अर्ज करण्या करीता लागणारे कागदपत्रे (Documents)
- आधार कार्ड म्हणून ओळखीचा पुरावा.
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- नॉन क्रीमिलेयर (Non-Creamy Layer)
- तहसीलदार याचा उत्पन्न दाखला (Income Certificate )
- इयता १० चे गुणपत्रक (Marksheet)
- इयता ११ मध्ये प्रवेश घेतल्याबाबत शाळेचे बोनाफाईड.
- विद्यार्थी एक फोटो.
- विद्यार्थी अनाथ असल्यास अनाथाचे प्रमाणपत्र.
- दिव्यांग असल्यास दाखला.
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया (Online Application Process)
१. सर्वप्रथम तुम्हाला https://www.mahajyoti.org.in या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
२. पुढे तुम्हाला “Free Tablet Yojana 2025” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3. पुढे जो आपल्यासमोर एक फ्रोम ओपेन होईल त्यात संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा.
४. नंतर आपल्याला दिसत असलेल्या पर्याय मध्ये संपूर्ण कागदपत्रे अपलोड करा.
५. तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन केल्या गेला असेल .
६. अर्जाची प्रिंट काढून जतन करून ठेवा.
🎁 टॅबलेटची वैशिष्ट्ये (Tablet Specifications)
- टॅबलेट हा Android 11+ ऑपरेटिंग सिस्टिम असलेला असतो.
- 8 इंच HD स्क्रीन मध्ये पूर्णपणे तयार असतो.
- 3GB RAM / 32GB स्टोरेज.
- टॅबलेट मध्ये WiFi आणि SIM कार्ड सपोर्ट असते दररोज ६ GB इंटरनेट Free असते.
- ई-बुक्स, व्हिडीओ लेक्चर्स आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आधीपासून सर्व ॲप्स इंस्टाल केलेले असतात..
▶️ योजनेचे फायदे
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणात मदत.
- ऑनलाइन शिक्षणासाठी मदतीची सुविधा.
- डिजिटल अभ्यासक्रमात एक महत्वाची क्रांती.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम मोफत.
- विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक क्षमता वाढविणे.
- स्पर्धा परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम आधी पासूनच स्टोरेज.
- विद्यार्थ्याना अभ्यासक्रम पूर्ण झाल्या नंतर सुद्धा पूर्णपणे मोफत.
🗓️ महत्वाच्या तारखा
| प्रक्रिया | दिनांक |
|---|---|
| ऑनलाइन अर्जाची सुरुवात | जुलै 2025 (अपेक्षित) |
| अर्जाची अंतिम तारीख | ऑगस्ट 2025 (अपेक्षित) |
| टॅबलेट वितरण | सप्टेंबर 2025 |
(टीप: ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून खात्री करा)
✅ निष्कर्ष
महाज्योती मोफत टॅबलेट योजना ही OBC, VJ, NT विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या दृस्ठीने संकल्पनात्मक आणि प्रगतीची दिशा देणारी योजना आहे. डिजिटल शिक्षणाचे साधन म्हणजे टॅबलेट, आणि ते मोफत मिळणे ही एक अद्वितीय संधी आहे. ज्यात गोरगरीब विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपले शिक्षण पूर्ण करून उज्वल भविष्य घडवावे हा त्या मागचा हेतू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या योजनेच्या पात्रतेत बसत असाल, तर आजच अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचला!
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र/मैत्रीणीना पाठवा जेणे करून या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. तसेच अश्याच नवनवीन माहिती करीता आमच्या खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
Whatsapp ग्रुप लिंक : https://chat.whatsapp.com/CBHeAtTGk5W5urpCjfevNB?mode=r_t






