शिष्यवृत्ती योजना 2025 – SC, OBC, NT विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण माहिती.

mahadbt scholarship 2025-विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी या करीता दरवर्षी अनुसूचित जाती (SC), अन्य मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती (VJNT) व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. 2025 सालातही या योजनांमध्ये अनेक बदल व सुधारणा करून नव्याने अर्ज मागवले जात आहेत. ही योजना विशेषतः 11वी, 12वी, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या लेखामध्ये आपण 2025 साठीची शिष्यवृत्ती योजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती घेणार आहोत तरी आपण दिलेली माहिती सविस्तर वाचावी.

या योजनेचे प्रमुख उदिष्टे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्याना दहावी नंतरच्या पुढील उच्चशिक्षणासाठी प्रोस्ताहन देणे आणि त्याना पुढील शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होऊ न देणे हे या योजनेमागील प्रमुख उदिष्टे आहे.

  • विद्यार्थी/विद्यार्थिनी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराने मान्यताप्राप्त शाळा / कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • जातीचे प्रमाणपत्र (SC, OBC, VJNT, NT) आवश्यक.
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न OBC/SBC: ₹ 2.5 लाखांपर्यंत असावे.
  • SC/VJNT/NT: कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
  1. जात प्रमाणपत्र. ( Cast Certificate)
  2. उत्पन्न दाखला. (Income Certificate)
  3. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड (TC/Bonafide)
  4. अधिवास प्रमाणपत्र. (Age Nationality And Domicile)
  5. आधार कार्ड. (Student)
  6. बँक पासबुक. (Student)
  7. मागील वर्षाचे गुणपत्रक. ( Marksheet)
  8. अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र. (Disability Certificate)
  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in
  2. पुढे तुम्हाला नवीन वापरकर्ता नोंदणी त्यावर क्लिक करून (Registration) करा.
  3. लॉगीन करून आपले प्रोफाईल तयार करा.
  4. शिष्यवृत्ती योजना 2025 हा पर्याय निवडा.
  5. सर्व माहिती अचूक भरा.
  6. आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  7. पुढे तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील त्यामधून आपल्या कॅटेगरी नुसार पर्याया वरती क्लिक करा.
  8. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
  • विद्यार्थी /विद्यार्थिनी चालू शैक्षणिक वर्षाची फी माफी.
  • हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थी /विद्यार्थिनी यांना फी माफी.
  • पुस्तक, स्टेशनरी भत्ता.
  • यातील काही योजना थेट बँक खात्यात रक्कम जमा करतात.
तपशीलतारीख
अर्ज सुरू15 जुलै 2025
शेवटची तारीख31 ऑगस्ट 2025
कागदपत्र पडताळणी15 सप्टेंबर 2025
  • अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक भरा.
  • आपल्या आधार कार्ड ला नेहमी मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा.
  • बँक मध्ये आधार (NPCI) म्हणजेच बँक खात्या ला आधार कार्ड लिंक असावे.
  • मोबाईल क्रमांक आणि इमेल नेहमी अपडेट असावा.
  • अर्जाची पावती व्यवस्थित सांभाळून ठेवा.

https://mahadbt.maharashtra.gov.in

1. शिष्यवृत्ती साठी कुठे अर्ज करायचा?

➡️ महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट https://mahadbt.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करता येतो.

2. अर्ज करताना मोबाईल नंबर बदलला तर काय करायचं?

➡️ प्रोफाइलमध्ये लॉगिन करून “Update Profile” मध्ये नंबर बदलता येतो. OTP चा वापर होतो.

3. माझ्या कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीची माहिती दिली जात नाही, तरी मी अर्ज करू शकतो का?

➡️ हो, स्वतः अर्ज करता येतो. कॉलेजमध्ये संस्थेची माहिती भरून देणं गरजेचं असतं.

4. शिष्यवृत्ती किती वेळेस मिळते?

➡️ ही शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते, परंतु प्रत्येक वर्षी नवीन अर्ज करणे आवश्यक असते.

5. शिष्यवृत्ती फ्रॉम भरल्यानंतर कोठे द्यावा लागतो ?

➡️ फ्रॉम पूर्णपणे भरून झाल्यास सदर फ्रॉम ची प्रिंट आणि अपलोड केलेले सर्व कागदपत्रे आपल्या कॉलेज मध्ये जमा करावी लागतात.

  • सर्व कागदपत्रे स्कॅन करून JPG किंवा PDF स्वरूपात ठेवा.
  • अर्ज सबमिट केल्यावर त्याची PDF नक्की सेव्ह करा.
  • आपल्या कॉलेजशी संपर्क ठेवा — काही वेळा अर्ज संस्थामार्फत फॉरवर्ड करावा लागतो.
  • फ्रॉम भरताना तुम्हीजो ID आणि PASSWORD बनविला होता तो वैयास्थित जतन करून ठेवा.
  • फ्रॉम भरताना दिलेला मोबाईल क्रमांक नेहमी सुरु ठेवा वेळोवेळी मिळणारी सर्व अपडेट तुम्हाला sms द्वारे दिल्या जाते.
  • चुकीची माहिती देऊ नका — अर्ज रिजेक्ट होतो.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती योजना 2025 ही शिक्षणात अडथळा न येण्यासाठी अत्यंत उपयुक्त संधी आहे. गरीब दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शिक्षणात आर्थिक मदत व्हावी व उच्च शिक्षणात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्या करीता शासन हि शिष्यवृत्ती योजना दरवर्षी राबवत असते.जर आपण या योजनेचा योग्य फायदा घेतला, तर आपल्या शिक्षणाची दिशा व प्रगती दोन्ही सुधारू शकते. त्यामुळे आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींनाही शेअर करा जेणे करून याचा फायदा इतरांना होईल.

Leave a Comment