नमस्कार शेतकरी बंधुनो,केंद्र सरकारने २०२४ मध्ये सुधारित पिक विमा योजना राबवली आहे. १३ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री पिक विमा या योजनेला सुरवात केलेली आहे.तसेच सन २०२३ पासून केंद्र सरकारने सर्वसमावेश नाममात्र १ रुपया भरून पिक विमा ला सुरवात केली होती.त्यातील २०२३ मध्ये पिकाचे नुकसान झालेल्या बऱ्याच शेतकर्यांना विमा मिळाला आहे परंतु २०२४ मधील पिक विमा अजून मिळायचा बाकी आहे त्याच संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे बघुया.
प्रधान मंत्री पिक विमा योजनेची माहिती थोडक्यात जाणून घेऊया :
- सुरवात : या योजनेची सुरवात : १३ जानेवारी २०१६ पासून सुरु झाली.
- हप्ता दर : पिकांसाठी साधारण हप्ता दर खरीप -२%, रब्बी -१.५%, वार्षिक पिकांसाठी - ५% असा दर असतो.
- लाभ : नैसर्गिक आपत्ती,कीड, दुष्काळ,अतिपावसामुळे आपल्या पिकांचे नुकसान भरून निघते.
- नुकसान भरपाई थेट आपल्या बँक खात्या मध्ये जमा होते.
पिक विमा कसा मिळतो या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे जाणून घेऊया :
शेतकरी मित्रांनो आता जून महिना जवळपास संपत आलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांची २०२४ चा पिक विमा केव्हा मिळेल हि प्रतीक्षा अजूनही कायम आहे. आणि सर्व स्तरावरून आपल्याला उडवा उडवी ची उत्तरे मिळत आहे आम्ही पिक विमा प्रतिनिधी सोबत चर्चा केली असता राज्य शासनाच्या निधीअभावी पिक विमा मिळण्यास विलंब होत आहे असे समजते.
जाणून घेऊया राज्य शासनाचा हप्ता आणि आपल्या पिक विमा कंपनी चा काय संबध असतो ?
वास्तविक जर पहायला गेले तर जेव्हा पिक पिमा योजना राबवली जाते त्या सुरवातीच्या काळातच राज्य सरकार कडून पिक विमा कंपनी ला पहिला हप्ता हा दिलेला असतो. हा निधी म्हणजे शासनाचा अंमलबजावणी चा खर्च असतो किंवा मागील वर्षी जो वितरीत असतो त्याच्या आधारावर असतो एक उदाहरण घेऊया (८०% च्या ५0% म्हणजेच एकूण ४०%) अश्या प्रकारे दिल्या जातो.याचप्रमाणे सन २०२४ खरीप हंगाम याकरिता देखील राज्यसरकार कडून सुमारे १२५५ कोटी रुपयांचे नियोजन करून उर्वरित रक्कम पहिल्या हप्त्यासाठी वितरीत करण्यात आलेली आहे.
दुसरा हप्ता केव्हा दिल्या जातो ?
दुसरा हप्ता हा पिक विमा कंपनी ला त्यांच्या गरजेनुसार दिला जातो म्हणजेच यातून स्थानिक पातळीवरील दावे असतात म्हणजेच यात पुढील प्रकारचे दावे असतात - Lacalized Claims उत्पनावर आधारित,काढणी नंतरचे दावे यात निकाली काढल्या जातात.
तिसरा हप्ता केव्हा दिल्या जातो ?
तिसरा हप्ता म्हणजे शिल्लक राहिलेला हप्ता हा म्हणजे साधारणपणे २०% इतका असतो यात ज्या जिल्ह्यांमध्ये काढणी नंतरच्या नुकसानीचा किंवा स्थानिक पातळीवर झालेल्या नुकसानीचा मोठा वाटा असतो ज्यामध्ये कंपनी ला ६०% ते ८०% पर्यंत वाटप करावी लागत असते. कारण २०% हा आधीच ठरलेला अमंल बजावणी खर्च असतो. परंतु एखाद्या वेळेस एका जिल्हात फक्त १०% वाटप केल्यागेली असेल तर तिथे पिक विमा कंपनी ला सरकारच्या गरज असते असे म्हणणे बिलकुल चुकीचेच आहे.
२०२४ चा पीकविमा मिळणार का ?
सर्व शेतकरी बंधूच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे २०२४ चा पिक विमा केव्हा मिळणार ? वस्तुस्थिती काय आहे आपण पुढे जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो आपल्याला कदाचित माहित नसेल राज्यामध्ये पिक विमा योजना हि एका विशिष्ठ मॉडेल नुसार राबवली जाते त्याला (Cup And Cap Model) म्हणतात ८०:११० या प्रमाणानुसार हि प्रकिया राबवली जाते.
उदाहरणार्थ : जर नुकसान ८०% कमी असेल तर २०% रक्कम हि विमा कंपनी ची असते व उरलेली रक्कम राज्यशासनाला परत करावी लागते.
समजा नुकसान भरपाई ११०% पेक्षा जास्त झाली असेल तर विक विमा कंपनी 100%पर्यंतच वाटप करते व त्या वैतिरिक्त लागणारी रक्कम हि राज्यशासन देते. म्हणून अश्या परीस्थिती मध्ये जर आपल्या जिह्यातील शेतकर्यांना पिक विमा मंजूर करायची असेल आणि नुकसान भरपाई रक्कम हि 100% किंवा त्याहून अधिक जात असेल तर जोपर्यंत राज्य शासनाकडून निधी मिळत नाही तोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकर्याना पैसे वाटप करतच नाही. म्हणून सरकारने घोषणा दिली म्हणजे तुम्हाला पिक विमा तत्काळ मिळेल हि अपेक्षा चुकीची आहे.
२०२४ पिक विमा बद्दल आपण काय अपेक्षा ठेवायची ?
समजा राज्य शासना कडून जर तिसरा हप्ता वितरीत झाला तर आधी ज्या जिल्ह्यांमधील स्थानिक पातळीवरील दावे किंवा पिक काढणी नंतर जे दावे असतात अद्याप पर्यंत प्रलंबित आहे सर्वप्रथम ते निकाली निघतील. परंतु शासनाकडून पैसे मिळाल्या नंतर पण कंपनी लगेच शेतकऱ्याच्या खात्य मध्ये रक्कम वितरीत करत नाही त्यात पण दोन ते तीन महिन्याचा वेळ निघून जातो.
म्हणून शेतकरी मित्रानो आपल्याला पिक विमा मिळण्यास विलंब होऊ शकतो जर राज्य सरकारने तिसरा हप्ता वितरीत केला तर राज्यभरातील अंदाजे ४०० कोटी रुपयांचे वितरण होण्याची दाट शक्यता आहे. त्या संदर्भात जर शासनाकडून काही अपडेट मिळाली तर आपल्या पर्यंत पोहचविण्याचा जरूर प्रयत्न करेल.
मित्रांनो वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र,व नातेवाईकांना जरूर पाठवा जेणे करून याचा फायदा होईल.
Proudly powered by WordPress
Uncover a realm of opportunities.
Exploring life's complex tapestry, options reveal routes to the exceptional, requiring innovation, inquisitiveness, and bravery for a deeply satisfying voyage.








