Pm Kisan Yojana 20 वा हप्ता 2025: तारीख, यादी, खाते तपासणी – संपूर्ण माहिती

pm kisan yojana:नमस्कार शेतकरी बंधुनो हि योजना भारत सरकारने शेतकऱ्यांना शेती करत असताना शेतीला आर्थिक आधार व्हावा या करीता २०१९ मध्ये सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील लहान व मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 थेट बँक खात्यात दिले जातात. हि रक्कम (२०००x३) या प्रमाणे वर्षातून 3 वेळा वितरीत केले जातात. आजपर्यंत भारत सरकारने 19 हप्ते यशस्वीरित्या वितरित केले असून आता 20 वा हप्ता लवकरच येणार आहे. त्याबद्दल pm kisan योजनेची संपूर्ण माहिती व आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात पुढे बघणार आहोत तर पुढील अत्यंत उपयोगी माहिती आपण शेवटपर्यंत वाचावी.

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • शासनाच्या कोणत्याही इतर शेतकरी अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसेल.
  • त्याच्याकडे स्वत:च्या नावावर २०१९ अगोदरची शेतीची जमीन असावी.
  • शासनाच्या नोकरीत असलेले, आयकरदाता किंवा सेवानिवृत्त लोक पात्र नाहीत

pm kisan scheme installment: पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा होतो. जर खाते आधार, मोबाईल नंबर व बँकेशी लिंक असेल तर पैसे वेळेवर मिळतात. त्याकरिता आपल्याला आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी सलग्न असणे अनिवार्य आहे अन्यथा आपल्या बँक खात्या वरती योजनेचे पैसे जमा केल्या जात नाही.

मित्रांनो तुमचे नाव PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या यादीत आहे की नाही, हे खालीलप्रमाणे तपासा:

खाते तपासणी स्टेप्स:

  1. अधिकृत वेबसाइट उघडा: https://pmkisan.gov.in
  2. होमपेजवर “Beneficiary Status” वर क्लिक करा.
  3. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.
  4. “Get Data” वर क्लिक करा.
  5. पुढे तुम्हाला तुमचे नाव, हप्त्याची तारीख व स्थिती दिसेल.

घरकुल योजना 2025 – पात्रता, अर्ज प्रक्रिया व यादी

जर हप्ता जमा झाला नसेल तर:

  • eKYC पूर्ण आहे का ते तपासा.
  • बँक खाते व आधार लिंक आहे का?
  • आपली जमीन Land Seeding झालेली आहे का बघा.
  • गावाचे कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क करा.
  • किंवा अधिक काही अडचण असल्यास खालील हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करा.
  • 155261
  • 1800-115-552
  • 011-24300606
  • आधार कार्ड.
  • सात बारा उतारा.
  • आठ अ.
  • फेरफार.
  • शेतकरी कार्ड.
  • बँक पासबुक.
  • रेशन कार्ड.
  • आधार सलग्न मोबाईल क्रमांक.
  • देशभरातील 12 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे.
  • योजनेद्वारे पैसे थेट बँकेत जमा होतात.
  • शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे.
  • या योजनेकरिता कोणताही दलाल किंवा मध्यस्थ नाही.
  • या योजनेद्वारे शेतकर्याना शेती मशागत करीता आर्थिक मदत होत आहे.
  • वर्षातून 3 वेळा पैसे थेट बँक मध्ये जमा करण्यात येतात.

Free Tablet Yojana 2025-महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट योजना 2025 OBC,VJ,NT,आणि SBC विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी.

शेतकरी मित्रांनो PM KISAN योजना ही छोट्या व मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्या मध्ये DBT प्रणालीद्वारे योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये जमा केल्या जातात आणि शेतकर्यांना शेती करत असताना आर्थिक हातभार लागतो या आधी सुद्धा भरत सरकारने PM KISAN योजनेचे १९ हप्ते यशस्वीरीत्या जमा करण्यात आलेले आहे. आणि २० वा हप्ता २०२५ मध्ये लवकरच जमा केल्या जाणार आहे, त्यामुळे आपले खाते, आधार, आणि eKYC अपडेट ठेवा. कोणतीही त्रुटी असल्यास त्वरित सुधारणा करा जर आपल्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर आपल्या बँक शाखे मध्ये जाऊन त्वरित लिंक करून घ्या अन्यथा आपल्याला PM KISAN योजनेचे पैसे थेट बँक खात्य मध्ये जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

मित्रांनो तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रीणीना पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहचवली जाईल. व अश्याच नवनवीन माहिती करिता व योजने करीता व नवीन अपडेट करिता आमच्या सोबत जुडून रहा…… धन्यवाद.

Leave a Comment